Ad will apear here
Next
‘मायग्रो इंडिया’ला ‘इंडस्ट्रियल एक्सलन्स’ पारितोषिक
पुणे : बंगळूरू येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका कृषीविषयक समारंभात पुण्यातील ‘मायग्रो इंडिया’ या कृषी मार्गदर्शक संस्थेला ‘इंडस्ट्रियल एक्सलन्स २०१८’ या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.  

‘भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि इथला शेतकरी सक्षम आणि सधन असलाच पाहिजे’, अशी प्रतिक्रीया ‘मायग्रो इंडिया’चे संस्थापक स्वप्नील टोपरे यांनी सन्मान स्वीकारताना व्यक्त केली. मायग्रो इंडिया उद्योगसमूह सेंद्रिय, जैविक आणि नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण औषधनिर्मिती, बायोडायनॅमिक पद्धतीचा सोपा व सहजरीत्या वापर या विषयांवर सातत्याने कार्यरत आहे, अशी माहितीही टोपरे आणि श्रीजित पनीकर यांनी दिली. 

संस्थेचे स्वप्नील टोपरे आणि श्रीजित पनीकर यांच्या नावे जैविक शेती तंत्रज्ञान या विषयावर अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रबंध आहेत. मराठवाड्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना संस्थेतर्फे विनामूल्य शेतीपूरक औषधांचे वापटही केले जाते. तसेच सर्व शेतकरी मित्रांना व होतकरू तरुणांना विनामूल्य मार्गदर्शनही केले जाते. ‘इंडस्ट्रियल एक्सलन्स’ या पारितोषिकाबद्दल संस्थेचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZJPBV
Similar Posts
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
राजगडाच्या पायथ्याशी मिळणार शेतकऱ्याच्या घरात राहण्याचा आनंद पुणे : खेडेगाव, शेती, शेतकरी याविषयी शहरी भागातील लोकांना कुतूहल असते. शहरी वातावरणापासून दूर, अस्सल गावरान आणि मोकळ्या हवेचा आनंद घेण्यासाठी शहरातील मंडळी आसुसलेली असतात. आता राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात हा आनंद अनुभवता येणार आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया पुणे : हंगामी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या आर्थिक वर्ष २०१९-२० साठीच्या अंतरिम अर्थसंकल्पावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language